भीषण अपघातात मर्सिडीजचा चुराडा; ३ ठार, १ जण गंभीर जखमी
भीषण अपघातात मर्सिडीजचा चुराडा; ३ ठार, १ जण गंभीर जखमी
img
Dipali Ghadwaje
इगतपुरी प्रतिनिधी : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई महामार्गावर बोरर्टेंभे येथे भीषण अपघात झाला आहे. या घटनेत ३ जण ठार झाले तर १ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. 

या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. भरधाव वेगातील मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेत ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. 

दरम्यान रूट पेट्रोलिंग टीम, टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलिस घोटी यांनी अपघाताची माहिती समजताच मदतकार्य केले. या अपघातात एमएच ०२ ईएक्स ६७७७ ह्या क्रमांकाच्या मर्सिडीज कारचा चक्काचूर झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group