धक्कादायक : भावली धरणात नाशिकच्या 5 जणांचा बुडून मृत्यू
धक्कादायक : भावली धरणात नाशिकच्या 5 जणांचा बुडून मृत्यू
img
Chandrakant Barve

इगतपुरीन - इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये ३ युवती आणि २ युवकांचा समावेश आहे.

हे सर्वजण आज दुपारी रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी गेले होते. सर्वजण नाशिकरोड परिसरातील राहणारे असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजते आहे. इगतपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन कार्यवाही सुरु केली आहे.

स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने ५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उत्तरीय तपासणी करण्यासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांची नावे अद्याप समजली नाही.

दरम्यान भावली धरणावर संबंधित विभागाकडून मार्गदर्शक नियमावली आणि सावधानी घेण्याबाबतचे फलक लावावेत अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.

मयत झालेले सर्व जण नाशिकरोडच्या गोसावीवाडीतील एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. या घटनेने गोसावीवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. 
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group