भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावाचा झाला खून
भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावाचा झाला खून
img
दैनिक भ्रमर
इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथे भाऊबंदकीच्या वादातुन ५० वर्षीय व्यक्तीचा खून झाला आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास  झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर धारदार शस्त्राच्या वाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , खून झालेला व्यक्ती संशयित आरोपीचा सक्खा चुलत भाऊ असल्याचे कळते आहे. जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्याआधीच संबंधिताचा मृत्यू झाला. मदन बबन गोईकणे (वय ५० रा. गिरणारे ता. इगतपुरी जि. नाशिक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

संशयित आरोपी महेंद्र भरत गोईकणे याच्याबरोबर आज सकाळी मदन गोईकणे यांचा वाद झाला होता. ह्या घटनेत अजूनही काही आरोपी आहेत अशी चर्चा  सुरु आहे. संशयित आरोपी महेंद्र गोईकणे याने धारदार शस्त्राने त्यांचा खून केल्याबाबतची फिर्याद देण्यासाठी मयताची सिंधूबाई मदन गोईकणे ह्या इगतपुरी पोलीस ठाण्यात गेल्या आहेत. इगतपुरी पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तातडीने तपास सुरु केला असल्याचे समजते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group