घोटी-सिन्नर महामार्गावर अंगावर शहारे आणणारी घटना
घोटी-सिन्नर महामार्गावर अंगावर शहारे आणणारी घटना
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- इगतपुरी तालुक्यातील घोटी-सिन्नर रोडवर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धामणी परिसरात घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की इगतपुरी तालुक्यातील धामणी परिसरात आज सकाळी एक ट्रक भरधाव वेगात जात होता. या ट्रकने दुचाकीवर असलेल्या शिवाजी विष्णू ठोके या युवकास जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की शिवाजी ठोके या युवकाच्या शरीराचे दोन तुकडे होऊन अर्धा भाग लांबवर फरफटत गेला.

नाशिकरोड जवळ चालत्या गोदान एक्सप्रेसच्या बोगी लागली आग, प्रवाशांची धावपळ


अपघात घडल्यानंतर ट्रकचालक तेथून फरारी झाला. त्यावेळी वाहतूक खोळंबली होती. ती सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचारी पोहोचला. वाहतूक सुरळीत करताना तेथे जमलेल्या नागरिकांनी पोलिसांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group