नाशिकरोड (प्रतिनिधी):- नाशिक रेल्वे स्थानकातुन भुसावळ कडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागल्याची घटना घडली आहे. रेल्वेगार्डच्या वेळीच लक्षात आल्याने गाडी थांबवून बोगीची आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुबंई लोकमान्य टिळक टर्मिन्स वरून -गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेस आज दुपारी नेहमी प्रमाणे नाशिकरोड रेल्वे स्थानकात आली, स्थानक सोडल्या नंतर गोरेवाडी नजीक, मनपाच्या जलशुद्धकरण केंद्रा जवळून गोदान एक्सप्रेस जात असतांना गाडीच्या मागील पार्सल बोगी मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले, काही सेकंदात वारा अधिक लागल्याने बोगी मधून अगीचे लोट येऊ लागले.शेजारील बोगी मधील प्रवासीच्या सदर बाब लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली.
त्यानंतर गाडीच्या गार्डला समाजल्या नंतर त्यांनी तात्काळ गाडी थांबवली, गाडी थांबताच प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. दरम्यान तात्काळ अग्निशमक दलाला कळवण्यात आले मात्र रेल्वे गाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्याने त्याना घटनास्थळी पोहचण्यात कसरत करावी लागली. तो पर्यंत रेल्वे कर्मचारी यांनी फोमच्या सहाय्याने आग विझावण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान स्थानक प्रबंधक श्रीवास्तव,रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरफूलसिंह यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश सोननसे, लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार संतोष उफाडे पाटील, कुलकर्णी आप्पा,आदि सह अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले मात्र हाय टेन्शन असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत असल्याने बोगी वर पाणी मारणे शक्य नव्हते. अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ बोगी पासून अगीने बाधित बोगी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. बोगी वेगळी झाल्या नंतर गोदान एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली.
या बाधित बोगीच्या शेजारी सर्वसाधारण बोगी होती, मात्र गाडी स्थानकातून सुटल्याने हळू धावत होती, म्हणून जीवितहानी झाली नाही, जर गाडी अजून काही किलोमीटर गेली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिककडे रवाना झाले असून या घटनेची उच्च सत्तरावर चौकशी होईल असे एका रेल्वे अधीकाऱ्याने सांगितले. बाधित बोगी मध्ये नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.