मुंबई नाशिक महामार्गावर साई कुटीर जवळ चालत्या कारने घेतला पेट घेतल्याची घटना घडली आहे. पेटलेली निसान beat कार असून ही घटना आज सकाळी पावणेदहाच्या सुमाराला घडली.
शॉर्ट सर्किटमुळे वाहनाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कारचालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला करून उडी मारली. सुदैवाने ह्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महामार्ग पोलिस केंद्र घोटी, इगतपुरी नगर परिषद अग्निशमन दल, टोल नाका अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे काम केले. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पिंप्री सदो फाट्यावरून वळवली गेली.