भावली धरणात बुडालेल्या नाशिकरोडच्या
भावली धरणात बुडालेल्या नाशिकरोडच्या "त्या" 5 जणांची नावे निष्पन्न
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- येथील गोसावीवाडी मधील एकाच कुटूंबातील पाच मुलांचा भावली धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यात दोन बहिणी एक सख्खे भावंड तर दोन चुलत भावाचा समावेश आहे.

सध्या प्रचंड उन्हाचा तडाखा असल्याने गोसावीवाडी येथील एका कुटूंबातील पाच शाळकरी मुलं व त्यांची आई असे रिक्षाने इगतपुरी येथील भावली धरण येथे फिरण्यासाठी गेले. पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे धरणाच्या एका बाजूला पाच भावंड आंघोळ करू लागले. धरणाचे खोदकाम सुरु असून मोठे डबके, गाळ याचा अंदाज या निष्पाप लेकरांना आला नाही.

त्यात पाय घसरून अनस खान दिलदार खान (वय 15), नाझिया इमरान खान (वय 15), मीजबाह दिलदार खान (वय 16), हनीफ अहमद शेख (वय 24), ईकरा दिलदार खान (वय 14) अशा तीन मुली व दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इगतपुरी पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले.

घटनेची माहिती समजताच गोसावीवाडी, नाशिकरोड भागातून अनेक नातेवाईक, मित्रपरिवार यांनी इगतपुरी येथे धाव घेतली. यामुळे गोसावीवाडी व नाशिकरोड परिसरावर शोककाळा पसरली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group