गर्भवती महिलांसाठी आनंदाची बातमी...! लसीकरणासाठी घेता येणार ऑनलाइन अपॉइंटमेंट , कुठे सुरु झाली
गर्भवती महिलांसाठी आनंदाची बातमी...! लसीकरणासाठी घेता येणार ऑनलाइन अपॉइंटमेंट , कुठे सुरु झाली "ही" खास सेवा?
img
Dipali Ghadwaje
बिहारमध्ये कोविड-19 लसीकरणासाठी सुरू करण्यात आलेले U-WIN पोर्टल आता सार्वजनिक लसीकरणासाठी  सुरू करण्यात आलंय. या पोर्टलद्वारे गरोदर महिला आणि बालके 12 प्रकारच्या लसींसाठी मोफत नोंदणी करू शकतात.

लसीकरणाचे प्रमाणपत्रही मिळेल. लसीकरण केलेल्या महिला आणि बालकांच्या नोंदी U-WIN पोर्टलवर सुरक्षित ठेवल्या जातील. त्यामुळं लसीकरणाची तारीख लक्षात ठेवण्याचं टेन्शन मिटणार आहे.

U-WIN च्या माध्यमातून आता गरोदर स्त्रिया किंवा बालकांना विविध प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी 12 प्रकारच्या लसीकरणासाठी मोफत नोंदणी करून लसीकरण करता येणार आहे.

याबाबत आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत बिहारमध्ये पोर्टल सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1.51 कोटी लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती.

U-Win पोर्टल म्हणजे काय?

U-WIN पोर्टल हे मोबाईल आधारित प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे नोंदणी केल्यानंतर, डीपीटी, पोलिओ, गोवर, रुबेला, गंभीर बालपण क्षयरोग, रोटाव्हायरस, डायरिया, हिपॅटायटीस बी, मेंदुज्वर, हिमोफिलस इन्फ्लूएंझा प्रकार बी, न्यूमोकोकल कॅनसाठी मोफत लसीकरण करता येणार आहे.

बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये या पोर्टलद्वारे लोक जेई लसीसाठी नोंदणी करत आहेत. एवढंच नाही तर पालक आपल्या मुलाचे ई-लसीकरण प्रमाणपत्रही या पोर्टलवरून डाउनलोड करू शकतात.

U-WIN पोर्टलचे एक वैशिष्ट्य म्हणजे लसीकरण केलेल्या महिला आणि बालकांच्या नोंदी त्यावर सुरक्षित ठेवल्या जातील. लसीकरणाच्या पुढील तारखेची माहिती देण्यासाठी सरकार पोर्टलच्या मदतीने मोबाईलवर मजकूर संदेश पाठवणार आहे, त्यामुळे वेळेतच महिला आणि बालकांना लसीकरण करणं शक्य होणार आहे.

गर्भवती महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक लसीकरणासाठी U-WIN पोर्टल सुरू बिहारमध्ये सुरू झालंय. त्यामुळं आता त्यांना अपॉइंटमेंट ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group