चिमुरड्याने रचला अनोखा विक्रम! 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद'
चिमुरड्याने रचला अनोखा विक्रम! 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद'
img
Dipali Ghadwaje
फिनलंडच्या शिक्षण पद्धतीचा आधार घेत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी रसायनशास्त्राच्या आवर्त सारणीतील म्हणजेच Periodic Table मधील सगळ्याच्या सगळ्या ११८ घटकांचं वाचन फक्त ५४ सेकंदात करत तनुष निपलवार या विद्यार्थ्याने अनोखा विक्रम रचला आहे.

नव्या शिक्षण धोरणाचा अवलंब करणाऱ्या पुण्याच्या द अकॅडमी स्कुलच्या सहा वर्षाच्या तनुष निपलवार या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झळकवण्याचा पराक्रम केला आहे.

वयाच्या सहाव्या वर्षी रसायनशास्त्राच्या आवर्त सारणीतील म्हणजेच Periodic Table मधील सगळ्याच्या सगळ्या ११८ घटकांचं वाचन फक्त ५४ सेकंदात करत तनुष निपलवार या विद्यार्थ्याने अनोखा विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्याला 'सुपर टॅलेंटेड किड' ही पदवी बहाल करण्यात आली आहे.  

रसायनशास्त्राचा पाया मानल्या जाणाऱ्या आवर्त सारणीत ११८ रसायनांचा आणि त्यांच्यातील परस्परसंबंधांचा समावेश असतो. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तनुषने फक्त ५४ सेकंदांत या सारणीतील ११८ घटकांचं वाचन करण्याचा विक्रम केला. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्याच्या या पराक्रमाची नोंद करण्यात आली. 

त्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये देखील इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तसंच तनुषची स्मरणशक्ती अविश्वसनीय असल्याची पावतीही त्यांनी दिली.
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group