खुशखबर...! महिलांना मिळणार मोफत ड्रायव्हिंग लायसन्स ;'या' राज्याने घेतला मोठा निर्णय
खुशखबर...! महिलांना मिळणार मोफत ड्रायव्हिंग लायसन्स ;'या' राज्याने घेतला मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
भारतात देशात जवळपास प्रत्येक घरात एकतरी वाहन हे आहे. प्रत्येकजण आपल्या खाजगी वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.वाहन चालवताना काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.  तसेच ड्रायव्हिंग लायसन्स नसूनही वाहन चालवले तर वाहतूक पोलिस कारवाई करतात. वाहनचालकाला दंड भरावा लागतो.

अशातच सध्या लायसन्स काढणे सोपे झाले आहे. वाहनधारक घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनेदेखील लायसन्स काढू शकतात. यासाठी काही शुल्क भरावे लागते. मात्र, भारतात एक राज्य असं आहे जिथे महिलांना लायसन्स काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही.

मध्यप्रदेशमध्ये महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. १८ वर्षांवरील प्रत्येक महिला मोफत ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकते. मध्यप्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे महिलांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स काढणे अत्यंत सोपे आणि सिंपल झाले आहे. एमपी परिवहन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत तब्बल ७,५२,६०० पेक्षा जास्त महिलांनी ड्रायव्हिंग लायसन्स काढले आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group