.... म्हणून कारमध्ये लपला अन् होत्याचं नव्हतं झालं; ५ वर्षीय चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू
.... म्हणून कारमध्ये लपला अन् होत्याचं नव्हतं झालं; ५ वर्षीय चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू
img
Dipali Ghadwaje
 
लहान मुलांना संभाळने फार कठीण काम असते. आई वडिलांना डोळ्यांत अगदी तेल घालून मुलांना संभाळावे लागते. लहान मुलांच्या मनाविरुद्ध वागल्यावर ते काय करतील आणि काय नाही याचा काहीच नेम नसतो. अशात गुजरातमध्ये एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. अंघोळीचा कंटाळा करून कारमध्ये लपून बसने एका चिमुकल्याच्या जिवावर बेतले आहे. 

अंघोळीचा कंटाळा आल्याने एक ५ वर्षांचा चिमुकला आपल्या कारमध्ये जाऊन लपून बसला. घरात बराच वेळ तो न दिसल्याने शोधाशोध सुरू झाली. कारकडे लक्ष गेल्यावर हा चिमुकला तेथे आढळला. कार आतून लॉक झाल्याने तो तेथेच गुदमरून मृत पावला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जुनागड GIDC येथे २३ सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकल्याची आई त्याच्या ३ वर्षांच्या भावाला अंघोळ घालत होती. भावाची अंघोळ झाल्यावर ५ वर्षीय चिमुकल्याची अंघोळ होती. आईने तसं त्याला सांगितलं होतं. आता अंघोळीपासून सुटका व्हावी म्हणून तो समोर असलेल्या कारमध्ये लपला होता.

काही वेळाने लहान मुलाची अंघोळ उरकून आई बाहेर आली आणि मोठ्या मुलाल शोधायला लागली. बराच वेळ झाला मुलगा सापडत नव्हता त्यामुळे तिने पतीला कॉलकरून याबाबत माहिती दिली. पुढे सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. यावेळी चिमुकला कारमध्ये लपल्याचे समजले. पालकांनी तेथे धाव घेतली तेव्हा त्याला श्वास घेता येत नव्हाता. उपचारासाठी त्याला जुनागढच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून चिमुकल्याला मृत घोषित केले. हे ऐकूण आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या बाळाचे अशा पद्धतीने निधन होईल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group