अभिनेता राजकुमार राव -पत्रलेखा झाले आई-बाबा, सोशल मीडियावर शेअर केली गुड न्यूज
अभिनेता राजकुमार राव -पत्रलेखा झाले आई-बाबा, सोशल मीडियावर शेअर केली गुड न्यूज
img
वैष्णवी सांगळे
बॉलिवूडमधून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा आई-बाबा झाले आहेत. पत्रलेखाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. राजकुमार रावने सोशल मीडियावर पोस्ट करत बाबा झाल्याची खुशखबर दिली आहे. 

लग्नाच्या चार वर्षांनी राजकुमार आणि पत्रलेखाने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाला त्यांच्या घरी लक्ष्मी आली आहे. 

२०१४ मध्ये रिलीज झालेल्या 'सिटीलाइट्स' चित्रपटात राजकुमार आणि पत्रलेखा यांनी एकत्र काम केले आहे. त्यांच्या केमिस्ट्रीचे चाहते दिवाने आहेत. चाहते आता राजकुमारच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अलिकडेच बॉलिवूडचे पावर कपल विकी कौशल-कतरिना कैफ हे देखील आई-बाबा झाले आहेत. कतरिनाने क्यूट मुलाल जन्म दिला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group