येवला-अंदरसुल रोडवर कारची दुचाकीला धडक; 1 ठार तर 3 जण गंभीर जखमी
येवला-अंदरसुल रोडवर कारची दुचाकीला धडक; 1 ठार तर 3 जण गंभीर जखमी
img
Dipali Ghadwaje
 येवला प्रतिनिधी ( दिपक सोनवणे)  : येवला अंदरसुल रोडवर एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 

या घटनेबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की, वैजापूर कडून येत असलेले एका आय ट्वेन्टी कार (नंबर एम एच 48 एसी 91 44)  हीने डिस्कवर दुचाकी स्वराला धडक दिली यामध्ये दुचाकी वरील दोन बालक एक महिला अशी चार जण जखमी झाले. त्यानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीररीत्या मार लागल्याने त्यांना नाशिक येथे तातडीने रवाना करण्यात आले.  

दरम्यान त्यातील मोटरसायकल चालकाचा रुग्णालयात जाताना मृत्यू झाल्याचे समजतेय. येवला तालुक्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group