वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अज्ञात वाहनाची धडक
वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अज्ञात वाहनाची धडक
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- वंचित बहुजन आघाडीचे महानगरप्रमुख तथा देवळाली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला एका अज्ञात गाडीने धडक दिल्याने या अपघातात ते जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की रात्री दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास अविनाश शिंदे देवळालीच्या कार्यालयातून आपल्या घरी जात होते. त्यांच्या समवेत त्यावेळी दोन ड्रायव्हरदेखील होते. वडनेर गेटकडून जात असताना त्यांच्या वाहनाला मागून येणार्‍या एका काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली व ती गाडी तेथून निघून गेली.

या अपघातात शिंदे यांच्या गाडीची मागील काच फुटली असून, शिंदे यांच्या मानेला, पाठीला व छातीला जोरदार मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न होता, हे मात्र कळू शकलेले नाही.

इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group