नाशिक (प्रतिनिधी) :- भगूरजवळील बार्न्स स्कूल रस्त्यावर आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
बार्न्स स्कूल रस्त्याने आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास काशिनाथ गवांडे हे त्यांच्या मालकीच्या एम.एच. 04, एफ.ए. 3117 या क्रमांकाची फोर्ड फिएस्टा कार घेऊन जात होते. त्यादरम्यान धावत्या कारच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने या कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती देवळाली अग्निशामक दलाला कळताच पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. कारला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे फायरमन दत्तात्रय सहाणे, शुभम् नेहे, ड्रायव्हर जयवंत गोडसे यांनी प्रयत्न केले.