मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर महामार्ग पाेलिसांनी मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणा-या लेनवर उद्यापासून (शनिवार, ता. 6 एप्रिल) मंगळवार (ता. 9 एप्रिल) पर्यंत अवजड वाहनांना बंदी घातली आहे. याची नाेंद वाहतुकदारांनी घ्यावी असे आवाहन महामार्ग पाेलिसांनी केले आहे.
उन्हाचा पारा चाळीस अंश पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर वाहनांचे टायर गरम होऊन फुटण्याची शक्यता असते. तसेच वाहनांचे इंजिन गरम होऊन आग लागण्याची शक्यता असते. या घटनांमुळे बोरघाटात वाहतुक ठप्प हाेते. या घटना टळाव्यात यासाठी महामार्ग पोलिसांनी एक युक्ती तयार केली आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना सहा एप्रिल ते नऊ एप्रिल पर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळे महामार्ग पोलिसांकडून अवजड वाहन मालक, चालक संघटनांना शनिवार ते मंगळवार पर्यंत अवजड वाहनं पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आणू नयेत असे आवाहन केले आहे.