शपधविधीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल , नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
शपधविधीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल , नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी जय्यत तयारीही सुरु आहे. शपथविधी सोहळ्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचसोबत या सोहळ्यासाठी वाहतुकीमध्ये बदल देखील करण्यात आले आहेत. 

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. आझाद मैदानावर उद्या सायंकाळी ५.३० वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्यासाठी वाहतुकीचा नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे.

महापालिका मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौकदरम्यान उद्या वाहतूक बंद असणार आहे. क. हजारीमल सोमानी मार्ग: चाफेकर बंधू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वाहतूक प्रतिबंधित करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते कोस्टल रोड दरम्यानची दोन्ही बाजूंची वाहतूक बंद राहणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत वाहतुकीचे नियमन लागू राहणार आहे.

या काळामध्ये नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. शपथविधी सोहळ्याला येणाऱ्यांना पार्किंगबाबत महत्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. आझाद मैदानात पार्किंगची व्यवस्था नसल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group