वाहतुकीचे नियम मोडणे महिलेला पडले चांगलेच महागात! 270 वेळा उल्लंघन केल्याने ठोठावला 'इतका' दंड
वाहतुकीचे नियम मोडणे महिलेला पडले चांगलेच महागात! 270 वेळा उल्लंघन केल्याने ठोठावला 'इतका' दंड
img
DB
 बेंगळुरूमधील एका महिलेला रहदारीचे नियम न पाळणे चांगलेच महागात पडले आहे .रहदारीचे नियम न पाळल्याने या महिलेला तब्बल 1.36 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. हेल्मेट न घालता स्कूटरवरून जात असलेली ही महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


हेल्मेट न घालता ही महिला तिच्या होंडा ॲक्टिव्हा स्कूटरवरून ट्रिपल सीट चालली होती. म्हणजेच ती तिच्यासोबत इतर दोन लोकांसह प्रवास करत होती. एका कन्नड न्यूज चॅनलने आपल्या यूट्यूब चॅनलवर या घटनेची सीसीटीव्ही फुटेजची छायाचित्रेही शेअर केली आहेत.

महत्वाचे म्हणजे या महिलेच्या स्कूटरवर 270 वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांनी 1.36 लाख रुपयांचे चालान तर बजावलेच शिवाय तिची स्कूटरही जप्त केली. या चालानची किंमत नवीन होंडा ॲक्टिव्हा स्कुटरपेक्षा जास्त आहे. 

महिलेने केलेल्या कथित उल्लंघनांमध्ये हेल्मेटशिवाय गाडी चालवणे, हेल्मेटशिवाय डबल सीट गाडी चालवणे, हून नेणे, रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे आणि ट्रॅफिक सिग्नल तोडणे यांचा समावेश आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group