दैनिक भ्रमर : तुम्ही वाहनधारक असाल तर तुमच्यासाठी बातमी आहे, नाहीतर विनाकारण तुम्हाला १० हजार रुपयांचा दंड बसू शकतो. राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट लावणे अनिवार्य आहे. दरम्यान, २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट लावल्या आहेत. त्याआधीच्या सर्व वाहनांना नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले आहे. यासाठीची शेवटची तारीख उद्या म्हणजे १५ ऑगस्टची आहे. जात तुम्ही एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे. उद्यापासून ज्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट नसेल त्यांच्याकडून दंड वसूल केले जाणार आहे. फक्त एका रजिस्ट्रेशनने तुम्ही हा दंड वाचवू शकणार आहात.
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन कसं करावं?
१) तुम्हाला सर्वात आधी transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
२) यानंतर Apply High Security Registration Plate Online या ऑप्शनवर क्लिक करा.
३) यानंतर तुम्हाला Order HSRP असं टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर टाकायचा आहे. याचसोबत मोबाईल नंबरदेखील टाका.
४) यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्यात येईल. तुम्हाला तुमच्या वाहनानुसार शुल्क भरायचे आहे.
५) त्यानंतर तुम्हाला रिसिप्ट मिळणार आहे. तुमची तुमच्या जवळच्या एजन्सीत अपॉइंटमेंट बुक होणार आहे.
६) त्यानंतर दिलेल्या तारखेला तुम्हाला एजन्सीत जाऊन नंबरप्लेट बदलून घ्यायची आहे.
जर तुम्ही १५ ऑगस्टपूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाहीये.त्यामुळे लगेच अप्लाय करा