HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी
HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी "या" तारखेपर्यंत मुदतवाढ
img
दैनिक भ्रमर
 
दि.१.४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि. ३१/३/२०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एजन्सी पण नियुक्त करण्यात आल्या आहेत.

आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी दि. ३०.६.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे परिपत्रक आज परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी काढले आहेत.

नाशिकमध्ये "या" दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार
इतर बातम्या
Join Whatsapp Group