पुण्यात झिका व्हायरसची लागण आणखी दोन लोकांना झाली आहे. पुण्यात वेगवेगळ्या भागांमधून झिका व्हायरसचे रुग्ण सापडत असल्याचे महानगर पालिकेने केले आहे. आतापर्यंत झिका व्हायरसचे 11 रुग्ण सापडले आहेत. खराडी आणि कर्वेनगर परिसरात प्रतिबंधात्मक कारवाई रविवारपासून सुरु केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , पीएमसीने दोन रुग्णांमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झाल्याची नोंद केली आहे. कर्वेनगरमधील 42 वर्षीय महिला आणि खराडी येथील 22 वर्षीय पुरुष. रुग्णांचे नमुने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे येथे पाठवण्यात आले आणि NIV कडून मिळालेल्या अहवालात त्यांच्या नमुन्यांमध्ये विषाणू संसर्गाची पुष्टी झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पॉझिटिव्ह आलेली महिला खासगी रुग्णालयाच्या विमा विभागात काम करते. तिने एका आठवड्यापेक्षा जास्त काळ विषाणूजन्य तापाची तक्रार केली आणि नंतर पुरळ उठले. खासगी रुग्णालयातील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले. शनिवारी तिच्या नमुन्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे,” असे पीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळीवंत यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षीय महिलेची प्रकृती स्थिर असून ती बाह्यरुग्ण विभागात औषध घेत आहे. हॉस्पिटलपासून एक किलोमीटर अंतरावर तिचे कर्वेनेजर येथील घर आहे. यानंतर रविवारी सकाळपासून परिसरात किटक सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
दुसरा रुग्ण खराडी येथील 22 वर्षीय पुरुष असून तो पीएमसी संचालित- कोद्रे हॉस्पिटल, मुंढवा येथे उपचारासाठी आला होता. त्याला काही दिवसांपासून ताप आणि पुरळ येत असल्याची तक्रार होती. त्याचे नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते, ज्यांनी व्हायरसच्या संसर्गाची पुष्टी केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पीएमसीचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ राजेश दिघे म्हणाले, “येरवडा-अहमदनगर रोड वॉर्ड ऑफिसच्या अखत्यारीत येणाऱ्या खराडीमध्ये हा पुरुष राहतो. संबंधित वॉर्ड अधिका-यांना त्याच्या निवासस्थानात आणि आजूबाजूला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सतर्क करण्यात आले आहे, ”तो म्हणाला.
झिका व्हायरसची लक्षणे
झिका विषाणू संक्रमित एडिस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो, जो डेंग्यू आणि चिकुनगुनिया सारख्या संक्रमणास प्रसारित करण्यासाठी ओळखला जातो. झिका ची लागण झालेल्यांपैकी बहुतेकांना लक्षणे नसतात (80% पर्यंत) किंवा ताप, पुरळ, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, अंगदुखी आणि सांधेदुखीची सौम्य लक्षणे दिसतात.
झिका विषाणू एखाद्या व्यक्तीची लक्षणे सुरू होण्याआधी, लक्षणे असताना आणि लक्षणे संपल्यानंतर संक्रमित होऊ शकतो. गर्भवती महिलांमध्ये झिका विषाणूमुळे जन्मजात मायक्रोसेफली, गुइलेन-बॅरे सिंड्रोम आणि इतर न्यूरोलॉजिकल गुंतागुंत होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.