दिवाळीच्या शुभ मूहूर्तावर सोने घेणं चांगलं असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेकजण सोने खरेदी करतात. आता दिवाळी सुरु व्हायला अवघे काहीच दिवस उरले आहे. मात्र सोने-चांदीच्या किंमतीने आज उच्चांक गाठला आहे. त्यामुळे दिवाळीच्या शूभमूहूर्तावर सोने खरेदी करत असाल तर भाव चेक करा.
गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे. दिवाळीआधीच सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका बसणार आहे. आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ८०,००० झाली आहे.
२४ कॅरेट सोन्याचे भाव
आज १ तोळा सोने ८०,२९० रुपयांवर विकले जात आहे. काल १ तोळा सोन्याची किंमत ७९,५८० रुपये आहे. सोन्याच्या दरात ७१० रुपयांनी वाढ झाली आहे.
८ ग्रॅम सोन्याची किंमत ६४,२३२ रुपये आहे.तर १ ग्रॅम सोन्याची किंमत ८,०२९ रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत १ तोळा सोन्याची किंमत ७३,६०० रुपये आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ६५० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५८,८८० रुपये आहे. १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,३६० रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत १ तोळा सोन्याची किंमत ६९,२२० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४८,१७६ रुपये आहे. १ ग्रॅम सोन्याची किंमत ६,०२२ रुपये आहे.
चांदीची किंमत
आज चांदीच्या किंमती मात्र स्थिर आहेत. चांदीच्या किंमतीत ना वाढ झाली ना चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. आज ८ ग्रॅम चांदी ७८४ रुपयांवर विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९८० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,८०० रुपये आहे.