ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीच्या भावाने ग्राहकांना जबरदस्त झटका दिला आहे. एप्रिल महिना सुरु झाल्यापासून सोन्याचे भाव सुसाट पळाले आहे. सलग तीन दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ होताना दिसून आली.
यापूर्वी सोन्याच्या भावाने मार्च महिन्यात उच्चांक पातळी ओलांडली होती. अशातच आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावाने उच्चांक पातळी गाठली आहे. सोन्याच्या भावात आज ७६० रुपये तर चांदीत प्रति किलोसाठी २००० रुपयांनी वाढ झाली आहे.
अमेरिकेतील मध्यवर्ती बँकांची स्थिती विस्कळीत झाल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या भावात सतत वाढ होत आहे. मार्च महिन्यात सोन्याचा भाव ६७ हजारांवर होता. तर आज सोन्याच्या भावात ३००० रुपयांनी वाढ झाली आहे.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,४२५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७०,०२० रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या भावात ७६० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी ८१,००० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात २००० रुपयांनी वाढ झाली आहे.
२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?
मुंबई- ६९,८७० रुपये
पुणे - ६९,८७० रुपये
नागपूर - ६९,८७० रुपये
नाशिक - ६९,९०० रुपये
ठाणे - ६९,८७० रुपये
अमरावती - ६९,८७० रुपये