सोने दरवाढीतून दिलासा, चांदी मात्र महागली!  जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचा दर
सोने दरवाढीतून दिलासा, चांदी मात्र महागली! जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचा दर
img
Dipali Ghadwaje
पौष महिना संपताच लग्नसराईला सुरुवात होणार आहे. त्यामुळे बाजारात आता खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. लग्नसराईत सोने खरेदीला खास महत्त्व दिलं जातं. त्यामुळे सध्या सराफा बाजारात सोने-चांदी खरेदीदारांची लगबग पाहायला मिळत आहे. तुम्हीही आज सोने-चांदी खरेदीच्या विचारात असाल, तर घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने-चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या.

आज मंगळवारी सोन्याचे दर स्थिर आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत 6327 रुपये प्रति ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 5800  रुपये प्रति ग्रॅम आहे. आज सोन्याचा दर स्थिर असला, तरी चांदी मात्र महागली आहे.

आज सोने-चांदीचा दर काय?
आज, 30 जानेवारी 2024 रोजी, संपूर्ण भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या किमती वेगवेगळ्या आहेत. 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोन्यासाठी 63,050 रुपये मोजावे लागत आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची सरासरी किंमत 57,800 रुपये होती, तर 18 कॅरेट सोन्याची 47,290 रुपये प्रतितोळा आहे. 

सोन्याचा भाव स्थिर,चांदी महागली
दरम्यान, आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत 300 रुपयांची वाढ झाली असून आज चांदीचा दर 76,500 रुपये प्रतिकिलो आहे. सोमवारी चांदीचा भाव 76,200 रुपये किलो होता. गेल्या आठवड्याभरात चांदीच्या दरात 1500 रुपयांची वाढ झाली आहे. 

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)

  • मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 
  • दिल्ली -  दिल्लीत सोनं 63420 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे.  
  • कोलकाता - कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.  
  • चेन्नई - चेन्नईत आज सोन्याचा दर 63930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.  
  • महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर  
  • पुणे - 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा दर 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 
  • नाशिक - 24 कॅरेट सोने 63300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 
  • नागपूर - 24 कॅरेट सोने 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.  
  • कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group