गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठे फेरबदल पहायला मिळत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरातही काहीअंशी वाढ झाली आहे.
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १७० रुपयांनी वाढले आहेत. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,२३,१७० रुपये खर्च करावे लागणार आहे. हे सोनं काल १,२३,००० रुपयांना विकले गेले. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,७०० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज त १२,३१,७०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१२,९०० रुपये मोजावे लागणार आहे. हे सोनं काल १,१२,७५० रुपयांना विकले गेले. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १,५०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,२९,००० रुपये खर्च करावे लागतील.