आनंदाची बातमी! खरेदीदारांना दिलासा...सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण
आनंदाची बातमी! खरेदीदारांना दिलासा...सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण
img
DB
सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांना  दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं सोनं चांदीच खरेद करण्याची ही मोठी संधी आहे.

सोने प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी सुमारे 1400 रुपयांनी स्वस्त झाली आहे.  

वायदे बाजारात चांदी स्वस्त

देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये बुधवारी चांदी 1413 रुपयांनी स्वस्त होऊन 84,254 रुपये झाली. मंगळवारी चांदी 85,658 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

सोन्याचे भावही कमी 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने 300 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. काल सोन्याचा भाव 72,122 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला (सोन्याचा भाव आज घसरला). आज बुधवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झाली आहे.

कोणत्या शहरात किती दर
दिल्ली -        73400 ( 24 कॅरेट)
मुंबई -          73250 
चेन्नई -          73250 
कोलकाता -   73250
अहमदाबाद -  73250
लखनौ -          73400
बंगळुरु -         73250
पटना -           73300
हैदराबाद -      73250
जयपूर  -        73400
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group