सध्या सणासुदीचे आणि लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. या काळात सोन्याची मागणी वाढत असल्याने दरामध्ये बदल होत असतो. आज सलग तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदीचा विचार करू शकता.
Goodreturns वेबसाईटनुसार, शनिवारी म्हणजेच आज १८ जानेवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,12,600 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,450 रुपयांना विकलं जात आहे. २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 59,600 रुपयांवर आहे. १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 74,500 रुपये इतका आहे. तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,45,000 रुपये इतका आहे
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,12,600 रुपये किंमतीने विकलं जातंय. १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 81,260 रुपये इतका आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 65,008 रुपये इतका आहे. १ ग्रॅम सोनं 8,126 रुपयांनी विकलं जात आहे.