अक्षय्य तृतियाच्या तोंडावर आणि लग्नसराईमध्ये सोन्याची किंमत घसरल्यामुळे ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढला आहे. प्रतितोळा एक लाख रूपयांच्या पार गेलेले सोन्याची किंमत दोन दिवसांपासून घसरत आहे. आजही सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.
जळगावच्या सराफ बाजारात एक तोळा सोन्याची किंमत २४०० रूपयांनी घसरली आहे. त्यामुळे सोनं ९९ हजरांवर आलेय.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात तब्बल अडीच हजार रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या किमतींना अखेर ब्रेक लागला. १ लाखांचा आकडा ओलांडलेले सोन्याचे दर आता जीएसटीसह ९९ हजार रुपयांवर आले आहेत. सोन्याच्या किंमती कमी झाल्यामुळे ग्राहकांमध्ये खरेदीसाठी सकारात्मकता दिसत आहे.
तोळ्याला एक लाख रूपयांपेक्षा कमी किमत झाल्यामुळे लग्नसराईच्या हंगामात सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
जळगावमधील सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, सोन्याच्या दरांमधील ही घसरण आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे झाली. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध संपवण्याची शक्यता आहे. अमेरिकेनेही याबाबत सकारात्मक पावलं उचलल्याचं दिसत आहे. त्यामुळेच जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत घट होत आहे.
२४ कॅरेटचं सोन्याची किंमत किती ?
२४ कॅरेटच्या एक तोळा सोन्याची किंमत ९८३४० रूपये इतकी आहे. २३ एप्रिल रोजी ही किंमत ९८५०० रूपये इतकी होती. २४ कॅरेटच्या १०० ग्रॅम सोन्याची किंमत १६०० रूपयांनी घसरून ९८३४०० रूपये इतकी झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याची किंमत जाणून घ्या
२४ कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रतितोळा १०० रूपयांनी घसरली आहे. सोनं आज प्रतितोळा ९०२०० रूपयांवर आलेय. १०० ग्राम सोन्याची किंमत एक हजार रूपयांनी घसरली आहे. १०० ग्राम सोन्याची किंमत ९०२००० रूपये इथकी झाली आहे.