३ जानेवारी २०२६
नाशिक : जुने सिडकोतील सामाजिक कार्यकर्ते ॲड. अजिंक्य प्रदीप गीते यांनी आज शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
ॲड.अजिंक्य गीते यांना विद्यार्थी चळवळ आणि वकिली क्षेत्रात कामाचा आणि संघटनाचा अनुभव असल्याने त्यांची शिवसेना उपमहानगर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांच्या हस्ते शनिवारी त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
Copyright ©2026 Bhramar