मनपाने आज नाशिकमधील कॉलेज रोडवरील ‘ही' अतिक्रमणे काढली
सुधीर कुलकर्णी
नाशिक (सुधीर कुलकर्णी) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, पुणे येथील अतिक्रमण काढण्याच्या मोहीम सुरू केल्यानंतर ही अतिक्रमण मोहीम आता नाशिक जिल्ह्यातही राबविली जात आहे. दोन दिवसाच्या मोहिमेनंतर आज पुन्हा कॉलेज रोड व गंगापूर रोड येथील बेकायदा बांधकाम व अतिक्रमण पाडले जाणार आहे.
या मोहिमेकरिता सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे मनपाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन पोलीस बंदोबस्त मागविला आहे. शनिवारी राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता अखेर जनतेने हे अतिक्रमण काढण्यात आले होते. आज (दि.1) नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने पुन्हा व्यापक मोहीम राबविली जाणार असून बारा वाजेच्या सुमारास गंगापूर रोड, कॉलेज रोड या भागातील अतिक्रमण काढले जाणार आहे. त्याकरिता मनपाचे अधिकारी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे हजर झाले असून, पोलीस कुमक महापालिकेच्या मुख्यालयासमोर तैनात करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने महात्मानगर येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या गेटजवळील, तसेच समोर असलेल्या विरू दा ढाबा मुंबई स्टेट आधी हॉटेलच्या अतिक्रमण काढणे सुरू केले. या मार्गावरील बॅनर्स त्याचप्रमाणे अतिक्रमित भाग काढण्याकरिता मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचारी वृंद दाखल झाला आहे.