नाशिकमध्ये उद्या
नाशिकमध्ये उद्या
img
वैष्णवी सांगळे
नाशिक : पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक 1 मधील एस्सार जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनी दिंडोरी रोड पंचवटी जलशुध्दीकरण केंद्राच्या उत्तर बाजुच्या गेट समोर कॅनॉल मध्ये नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाईप लाईन गळती सुरु झालेली आहे. या पाईप लाईनची दुरुस्ती तत्काळ करणे गरजेचे आहे. हे काम उद्या (दि.7) हाती घेण्यात येणार आहे.

हे ही वाचा ! 
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना मोठा फटका ! 'या' क्षेत्रात घसरण

त्यामुळे एस्सार व गोरक्षनगर जलकुंभावरुन होणारा प्रभाग क्र.1 मधील दिंडोरी रोडच्या पुर्वेकडील भाग गजपंथ सोसायटी, रामचंद्रनगर, वडजे मळा, म्हाडा कॉलनी, कलानगर, प्रसादनगर, विजयनगर, पोकार कॉलनी, गायत्रीनगर, साईनगर, राजमाता मंगल कार्यालयापर्यंत तसेच देवधर कॉलेज, विनायक नगर, मधुर स्वीट परिसर, उमीया माता मंदिर परिसर, गोरक्षनगर इत्यादी परिसरात उद्या दि . ७ रोजी पाणी पुरवठा होणार नाही व शुक्रवार दि.8 रोजीचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा ! 
इतर बातम्या
Join Whatsapp Group