नाशिक : बिटकॉईन ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून 16 लाखांची फसवणूक
नाशिक : बिटकॉईन ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून 16 लाखांची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : बिटकॉईन ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचे आमिष मिळविण्याच्या नादात एका इसमाने 16 लाख रुपये गमावले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादीसोबत व्हॉट्सअ‍ॅपद्वारे काही व्यक्तींनी चॅटिंग करण्यास सुरुवात केली. 

चॅटिंग करणार्‍या व्यक्तींनी एका वेबसाईटच्या माध्यमातून बिटकॉईन ट्रेडिंगवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांनी फिर्यादीला यूएसडीटी खरेदी करण्यास सांगितले. या आमिषाला फिर्यादी भुलले. दि. 13 जून ते 5 ऑगस्ट 2025 या काळात चॅटिंग करणार्‍या व्यक्तींनी फिर्यादींना यूएसडीटी खरेदी करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या बँक अकाऊंटवर 15 लाख 85 हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले. 

महत्त्वाचे ! सरकारी योजनेच्या लाभाचे पैसे ३ महिने बँकेत पडून राहिल्यास ती रक्कम शासनाजमा होणार ?

त्या व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे फिर्यादींनी सर्व रक्कम ट्रान्स्फर केली; मात्र कोणताही नफा न मिळाल्याने फिर्यादीने त्यांच्याशी संपर्क साधला असता आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group