नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : बंदुकीचा धाक दाखवून कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत एका युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की आरोपी कुणाल सुनील चौरे (वय 26, रा. सुदर्शन कॉलनी, पेठ रोड, पंचवटी) याने पीडित तरुणीला बंदुकीचा धाक दाखवून कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी त्र्यंबकेश्वर व गंगापूर रोड येथे अत्याचार केले.
“माझ्याकडे बंदूक आहे. तू माझ्याशी संबंध ठेवले नाहीत, तर तुझ्या आईला व भावाला मारून टाकीन,” अशी धमकी देऊन तो अत्याचार करीत होता. त्याने पीडितेला शिवीगाळ करून मारहाणदेखील केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार सन 2023 पासून दि. 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान सुरू होता. कुणाल चौरे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.