नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- फुले आणण्याच्या कारणातून 8 जणांच्या टोळक्याने एका फार्मासिस्ट तरूणावर प्राण घातक हल्ला करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी अमिर असरारूल खान (वय 24, रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) व त्याचा मित्र मुजाहिद सय्यद याच्या बहिणीच्या रिसेप्शनसाठी फुले आणण्याविषयी विचारपूस करत होते. त्यावेळी तेथे बसलेल्या चार अनोळखी इसमांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच अन्य एकाने दगड मारला. तो दगड फिर्यादीच्या डाव्या दंडाला लागला.
तसेच फिर्यादी तिथून जात असताना पुन्हा अनोळखी चार आरोपींचे चार मित्र तेथे आले. त्या सर्वांनी संगनमत करुन फिर्यादी खान व त्याच्या मित्राला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील काही आरोपींनी हातातील कड्याने फिर्यादीच्या डोक्यावर मारुन त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत फिर्यादी खान यांच्या डोक्याला तीन ठिकाणी गंभीर दुखापत झाली.
हा प्रकार 9 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास द्वारका ते सारडा सर्कलकडे जाणार्या रस्त्यावर भरवस्तीत घडला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आठ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करीत आहे.