भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ ! उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ ! उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना
img
वैष्णवी सांगळे
गेल्या ८ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात आज अकरा नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडत असताना,  भगुर नगरपरिषद मतदारसंघात मात्र मतदानावेळी मात्र अजब प्रकार पहायला मिळाला. 

नेमकं प्रकरण काय ? 
भगुर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उभ्या असलेल्या शांता गायकवाड यांचे नाव मतदारांच्या यादीत कुठेही दिसत नसल्याचा प्रकार समोर आला. उमेदवाराचेच नाव नसल्याने खुद्द उमेदवारालाही या गोंधळात अडकावे लागले. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नाशिक जिल्ह्यातील एकूण अकरा नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील ४१६ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडत आहे, ज्यात नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांसह सदस्यांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. यासाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी सेवेत असून, संवेदनशील केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group