नाशिक : सराईत गुन्हेगाराकडून महिलेवर पाशवी लैंगिक अत्याचार
नाशिक : सराईत गुन्हेगाराकडून महिलेवर पाशवी लैंगिक अत्याचार
img
वैष्णवी सांगळे
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : अनेक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने सोबत राहणार्‍या महिलेवर जबरदस्तीने पाशवी लैंगिक अत्याचार करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी किरण मोहनन पिल्ला (मूळ रा. केरळ, ह. मु. नाशिक) हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध शहरासह जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी महिला व आरोपी किरण पिल्ला हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे असून, ते सोबत राहत होते. 

दि. 5 नोव्हेंबर 2024 ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत ते पाथर्डी गाव परिसरात सोबत राहत होते. त्यावेळी आरोपी पिल्ला याने पीडितेची इच्छा नसताना महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी त्याने पीडितेची इच्छा नसताना तिला शारीरिक इजा होतील, या पद्धतीने दातांनी चावून व नखांनी ओरबाडून तिच्यावर बळजबरीने पाशवी लैंगिक अत्याचार केले. 

या प्रकाराला विरोध केला असता आरोपी पिल्ला याने पीडितेला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केली. वारंवार होणार्‍या या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात आरोपी किरण पिल्ला याच्याविरुद्ध बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. बारी करीत आहेत.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group