नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट, हवामान विभागाकडून हायअलर्ट
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट, हवामान विभागाकडून हायअलर्ट
img
वैष्णवी सांगळे
राज्याच्या अनेक भागात पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे.  विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानाचा पारा हा 6 अंशांहून कमी झाला आहे तर भारतीय हवामान विभागाने दिलेल्या  माहितीनुसार, राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये कोल्ड वेवची स्थिती कायम राहणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 

नाशिकची परिस्थिती काय ? 
नाशिक आणि निफाडमध्ये थंडीचा मुक्काम कायम आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र मध्ये थंडीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. निफाडचे तापमान 6.1 अंश सेल्सिअस तर नाशिकचा पारा 8.2 अंशावर गेला आहे. पुढील दोन तीन दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुणे शहराचे तापमान 8.1 अंशावर घसरले आहे. यंदाचा हंगामात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून पुण्यात थंडीची लाट येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. नागपुरात आज 8.1 डिग्री सेल्सियस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. भंडाऱ्यात किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके आहे, तर बुलढाण्यात 12.2 अंश इतके तापमान आहे, गोंदियामध्ये आजचे तापमान 8.4 अंश सेल्सिअस इतके आहे, तर परभणीचे तापमान 5.5 अंश सेल्सिअस इतके आहे.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group