नाशिकमध्ये
नाशिकमध्ये "या" भागात शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार
img
दैनिक भ्रमर

मनपाचे मुकणे रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये बस वे दुरुस्ती काम, २२० केव्ही पीटी बदलणे व इतर अनुषंगिक कामे करावी लागणार आहेत. यासाठी शनिवार दि. ९ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पॉवर सप्लाय बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथून होणारा पाणी पुरवठा करणं शक्य होणार नाही. म्हणून शनिवार दि. ९ रोजी नाशिक शहरातील नवीन नाशिक विभागातील प्रभाग क. २२, २८, २९, ३१, नाशिक पुर्व विभागातील प्रभाग क्र. ३०, २३ (भागशः), नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. २२ (भागशः) व सातपूर विभागातील प्रभाग क्र. २४, २५, २६ (भागशः) भागास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही.

तसेच रविवार दि. १० रोजी पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. या भागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group