भयंकर! १५ वेळा उलटली कार,  प्रवाशी हवेत उडाले ; वडिलांसह दोन मुलं ठार , घटना सीसीटीव्हीत कैद
भयंकर! १५ वेळा उलटली कार, प्रवाशी हवेत उडाले ; वडिलांसह दोन मुलं ठार , घटना सीसीटीव्हीत कैद
img
Dipali Ghadwaje
कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्ग- 150 ए वर मंगळवारी एक हृदयद्रावक अपघात घडला. चित्रदुर्ग जिल्ह्यातील मोनकलमुरू तालुक्यातील बोम्मक्कनहल्ली मशिदीजवळ हा अपघात झाला.

या अपघातात वडील आणि दोन मुलांना जीव गमवावा लागला. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये एक कार डिव्हायडरला धडकल्यानंतर 15 वेळा उलटल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान कारमधील लोक हवेत उडताना दिसत आहेत.

अपघातातील मृतांमध्ये 35 वर्षीय मौला अब्दुलचा यांचा समावेश आहे, जे गाडी चालवत होते. त्यांचे दोन्ही मुलगे, रहमान (15 वर्षे) आणि समीर (10 वर्षे) यांचाही या अपघातात मृत्यू झाला.

अब्दुल यांची पत्नी सलीमा बेगम, आई फातिमा आणि मुलगा हुसेन हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना जवळील  रुग्णालयात दाखल केले आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group