मोलकरणीवरील बलात्कार प्रकरणात न्यायालयाने माजी खासदार आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी रेवण्णा यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर आता विशेष न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.
हे ही वाचा...
कर्नाटकच्या बंगळुरू येथील जनता दल सेक्युलर पक्षाचे माजी खासदार आणि पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फार्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या महिलेवरील बलात्कारप्रकरणी प्रज्वल रेवण्णावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा...
जनता दल सेक्युलर पक्षाला (JDU) हा मोठा झटका मानला जातो. दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वीच प्रज्वल रेवण्णा यांच्यावरील आरोपांमुळे राजकीय वर्तुळात रान उठले होते. त्यानंतर, देशभरात हे प्रकरण चर्चेत असल्याने आजच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले होते. प्रज्वल रेवण्णा याला चार लैंगिक शोषण व बलात्कार प्रकरणांपैकी एका प्रकरणात दोषी ठरवले. विशेष न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी आज रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.