मोठी बातमी...! नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावर देवीचे 24 तास दर्शन, भाविकांसाठी पर्वणी
मोठी बातमी...! नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावर देवीचे 24 तास दर्शन, भाविकांसाठी पर्वणी
img
Dipali Ghadwaje
नाशिक : सप्तश्रृंगी देवीच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आलीय. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.नवरात्र काळात मंदिर 24 तास खुले राहणार आहे.

नवरात्रोत्सवात गडावर भाविकांची संख्या लाखोंमध्ये असते. एकाचवेळी अनेक भाविक गडावर जमतात. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी या नऊ दिवसांमध्ये असते. त्यामुळे आता नवरात्रौत्सव काळात सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. ०३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. नवरात्रौत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी निर्णय घेण्यात आलाय.
 
दरम्यान देवीच्या मंदिरात जाणारी फनिक्युलर ट्रॉली देखील २४ तास कार्यान्वित असणार आहे. मंदिर गाभाऱ्यात फनिक्युलर ट्रॉलीने येणाऱ्या भाविकांना ३० टक्के तर पायरीने येणाऱ्या भाविकांना ७० टक्के प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला गेलाय.

नवरात्रौत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गडादरम्यान खासगी वाहतूक बंद राहणार आहे. १०० एसटी बसेसच्या माध्यमातून नांदुरी ते सप्तशृंगी गड भाविकांची वाहतूक करण्याचं नियोजन आहे. भाविकांना नांदुरीवरून गडावर  जाण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group