सप्टेंबर महिन्याचे  ''हे'' तीन दिवस सप्तशृंगी गड घाट रस्ता राहणार बंद
सप्टेंबर महिन्याचे ''हे'' तीन दिवस सप्तशृंगी गड घाट रस्ता राहणार बंद
img
दैनिक भ्रमर
येत्या  काही दिवसांत नवरात्र उत्सवास सुरुवात होणार आहे . संपूर्ण देशभरात नवरात्रोस्तव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  या नवरात्रोत्सवासाठी खास ठिकठिकाणच्या देवी मंदिराचे देखभालीचे काम केले जाते जेणेकरून भक्तांसाठी  प्रवास आणि दर्शन सोयीस्कर होईल . या पार्श्वभूमीवर सप्तश्रृंगी देवी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवी गडावरील दरड प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामासाठी सप्तशृंगी गड घाट रस्ता 
 वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जर तुम्हीही याच दरम्यान वाणी गडावर दर्शनाला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठीच आहे .  आहे . 

दरड प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामासाठी 23 सप्टेंबर आणि 25 व 26 सप्टेंबर हे तीन दिवस सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ( पाच तास ) नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यंदा शारदीय नवरात्र 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आता हे काम हाती घेतलं आहे. यामुळे भक्तांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित होणार आहे.

सप्तश्रृंगी गडावर देखभालीच्या कामासाठी सहाय्यक अभियंता श्रेणी १. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४ कळवण नाशिक यांनी 20 सप्टेंबरला सप्तश्रृंगी गड ते नांदुरी रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत सुरु असलेलया कामाकरिता रस्ता बंद करण्याबाबतचे पत्र सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यावर कारवाई करत आता सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांनी सप्तश्रृंगीगड ते नांदुरी या रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जाळ्या बसवणे व बॅरियर बसविणे हे काम हाती घेतले आहे.

दरम्यान , आगामी शारदीय नवरात्र उत्सवादरम्यान देवीचं दर्शन भाविकांना 24 तास खुले राहणार आहे. नवरात्री निमित्त भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात. 100 एसटी बसेसच्या माध्यमातून नांदुरी ते सप्तशृंगी गड भाविकांची वाहतूक करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group