गुढीपाडव्यापूर्वीच सोनं ७२ हजारांवर? खरेदीसाठी मागणीत वाढ सुरुच; कारण आहे काय?
गुढीपाडव्यापूर्वीच सोनं ७२ हजारांवर? खरेदीसाठी मागणीत वाढ सुरुच; कारण आहे काय?
img
Dipali Ghadwaje
मागच्या वर्षी दिवाळीत सोन्याचे भाव नरमले होते. परंतु, डिसेंबर महिना सुरु झाला आणि सोन्याच्या भावाने उच्चांक पातळी गाठली. नवे वर्ष सुरु झाल्यापासून सोन्याच्या भावात पहिले दोन महिने पतझड पाहायला मिळाली.

मार्च महिना सुरु होताच सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. पहिले १५ दिवस सोन्याचा चढता आलेख पाहायला मिळाला. तर महिन्याच्या अखेरी पुन्हा भावात वाढ झालेली पाहायला मिळाली.

एप्रिल महिना सुरु झाल्यापासून सलग चार दिवस सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. पहिल्यांदा सोन्याने इतकी मोठी उसळी घेतली आहे. लग्नसराईचा काळ असल्यामुळे धातुच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांना अधिक पैसे  मोजावे लागणार आहे. अशातच सोन्याच्या भाव वाढ असला तरी खरेदीदारांच्या मागणीत वाढही पाहायला मिळाली. गुढीपाडव्यापूर्वीच सोन्याचे भाव ७२ हजारांवर पोहोचेल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या  काळात खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

का वाढताय सोन्याचे भाव?

वर्ल्ड गोल्डच्या रिपोर्टनुसार २०२४ मध्ये राजकीय तणाव, सेंट्रल बँकांद्वारे सोने खरेदी आणि मंदीमुळे सोन्याच्या भावात पुन्हा झळाळी पाहायला मिळू शकते. तसेच जागतिक भू राजकीय परिस्थिती, अमेरिकेत्या फेडरल रिझर्व्हचे व्याजदर कपातीचे संकेत यामुळे सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group