यंदाच्या रक्षाबंधनाला भद्रा काळ असल्या कारणाने अनेक लोक चिंतेत आहेत. त्यामुळे भद्राकाळात भावाला राखी कधी आणि केव्हा बांधावी हा बहिणींना प्रश्न पडला आहे. यासाठीच, ज्योतिष शास्त्रानुसार, असं सांगण्यात आलं आहे की यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ आहे पण त्याचा पृथ्वीवर कोणताच परिणाम होणार नाही.
आज रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाळसुद्धा लागणार आहे. या दिवशी सकाळी 7 वाजून 31 मिनिटांपासून ते सकाळी 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत राहु काळ असणार आहे. त्यामुळे काळात चुकूनही राखी बांधू नये.
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 01.46 पासून ते संध्याकाळी 04.19 पर्यंत असणार आहे. याचाच अर्थ राखी बांधण्यासाठी 2 तास 33 मिनिटांचा काळ असणार आहे. याशिवाय, तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळातसुद्धा भावाला राखी बांधू शकता.या दविशी संध्याकाळी 06.56 ते रात्री 09.07 वाजेपर्यंत प्रदोष काळ असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर कोणताही दावा करत नाही.)