''या'' वेळेत बांधू नका राखी, जाणून घ्या नेमका मुहूर्त काय?
''या'' वेळेत बांधू नका राखी, जाणून घ्या नेमका मुहूर्त काय?
img
दैनिक भ्रमर
उद्या म्हणजेच सोमवार, १९ ऑगस्ट रोजी सर्वत्र  रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येईल. दरम्यान उद्या दिवसभरात राखी बांधण्याचा नेमका मुहूर्त काय आहे हे जाणून घेऊया. उद्या  दुपारी दीड वाजेपर्यंत भद्रा काळ राहील. त्यामुळे या काळात चुकूनही राखी बंधू नये. या कारणास्तव राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1.30 नंतर सुरू होईल. रक्षाबंधनला भद्रा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विशेष काळ मुहूर्तासाठी पाहिला जात नाही.

भद्रा काळ संपल्यानंतर सूर्यास्तापर्यंत कधीही बहिणी आपल्या भावांना राखी बांधू शकतात. रक्षाबंधन रात्री साजरे करण्याचे विधान कोणत्याही धर्मग्रंथात नाही, मात्र काही कारणास्तव दिवसा रक्षाबंधन साजरे करता आले नाही तर सूर्यास्तानंतरही राखी बांधण्याची परंपरा आहे.

असं म्हणतात की, भद्रकाळात राखी बांधल्यास भावाला अडचणींचा सामना करावा लागतो. ज्योतिषी रोहित पुजारी यांनी सांगितलं की, आपण दुपारी 1:29 वाजल्यापासून दिवसभरात कधीही राखी बंधू शकता. रात्री 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ काळ आहे. मात्र याच दिवशी पंचकही निर्माण होतोय.

संध्याकाळी 7 वाजता पंचक योग सुरू होईल. पंचक योगात राखी बांधणं अत्यंत शुभ मानलं जातं. या शुभमुहूर्तावर आपण रक्षाबंधन सण साजरा केला तर उत्तम, असं ज्योतिषांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे श्रावण सोमवार विशेष मानले जातात आणि यंदा रक्षाबंधन सण सोमवारीच आहे.

दरम्यान, अत्यंत पवित्र अशा भाऊ-बहिणीच्या नात्याचा हा सण, जो आधीच खास असतो. परंतु यंदाचा रक्षाबंधन मात्र आणखी खास असेल. कारण या दिवशी वर्षांमागून अनेक वर्षे सरल्यानंतर सर्वार्थ सिद्धी योगासारखे काही शुभ योग जुळून येणार आहेत. त्यामुळे आपण हा दिवस प्रसन्न वातावरणात साजरा करावा. घरातलं वातावरण शांत असायला हवं. बहिणींनी स्वतःच्या हाताने गोडाचा पदार्थ बनवून भावाचं तोंड गोड करावं आणि भावाने बहिणीला खास अशी भेटवस्तू द्यावी.
इतर बातम्या
Join Whatsapp Group