मुंबई: गणेशोत्सवानिमित्त सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईत गणपतीची धूमधाम सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. गतवर्षी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यंदाही लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. यंदा शनिवारी ते पुन्हा एकदा लालबागच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणार असून त्यांचा मुंबई दौरा ठरला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी (23 सप्टेंबर) मुंबई दौऱ्यावर असणार आहेत.यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा संपूर्ण कार्यक्रम ठरला असून यंदाही ते सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत. दरम्यान, गेल्यावर्षीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लालबागमध्ये उपस्थित राहिले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दरबारात 25 मिनटं असणार आहेत. त्यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवणार आहेत.
राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष उद्भवला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळून सत्तेत शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर गेल्यावर्षी अमित शाह पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सहकुटुंब उपस्थित राहिले होते.
त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्याचबरोबर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हेसुद्धा उपस्थित होते. यंदाही अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत.
कसा असेल अमित शहा यांचा मुंबई दौरा?
- दुपारी 2 वाजता मुंबई विमानतळ
- 3 वाजता : लालबाग राजा दर्शन
- 3.50 ते 4 : वर्षा निवासस्थानी बाप्पाचे दर्शन
- 4 ते 4.15 : सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचे दर्शन
- 4.30 : वांद्रे आशिष शेलार यांचा सार्वजनिक गणपती
- 5.30 ते 7 : लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रम मुंबई विद्यापीठ येथे
- 7 वाजता दिल्लीसाठी रवाना