उद्यापासून सप्तशृंग गडावर धावणार 'इलेक्ट्रीक बस'
नाशिक : सप्तशृंग गडावर सोमवार, दि. 1 एप्रिल पासून एसटी महामंडळ इलेक्ट्रीक बस सेवा सुरू करणार आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंग गडावर विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात, त्यामुळे एसटी महामंडळ ही बस सेवा सुरू करीत आहेत. सकाळी 5 ते सायंकाळी6.15 पर्यंत ही बस जुने सीबीएस येथून सुटणार आहे.