नाशिकचे
नाशिकचे "हे" पदाधिकारी थोड्याच वेळात करणार शिंदे सेनेत प्रवेश
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इन कमिंग सुरू आहे. कालच सतनाम राजपूत, माजी नगरसेविका कविता कर्डक आणि सागर देशमुख यांनी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.

महापालिका निवडणुकीत भाजपकडून तिकीट अपेक्षित असलेले मराठा समाज नेते करण गायकर, माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील आणि सागर जारे हे युवा नेते तिकीट मिळण्याची शक्यता मावळल्याने भाजपमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. आज सायंकाळी थोड्या वेळात त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश सोहळा होत आहे.

करण गायकर हे क्रांतिवीर छावा संघटनेचे संस्थापक असून विधानसभा निवडणूक काळात  महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी राजे यांच्या समवेत कार्यरत होते. मराठा नेते मनोज जरांगे यांनाही त्यांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला होता. सध्या ते भाजपाशी जवळीक साधून होते.

प्रेम पाटील हे माजी महापौर दशरथ पाटील यांचे सुपुत्र असून राजकारणात येण्यासाठी दमदार संधीच्या प्रतीक्षेत आहेत, नगरसेवक म्हणून निवडून आले तर त्यांची राजकीय कारकिर्द सुरू होऊ शकते.

भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने करण गायकर, प्रेम पाटील यांनी उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटाचा पर्याय स्वीकारल्याचे मानले जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group