सर्वाधिक मतदान झालेल्या त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत भाजपला धक्का बसला आहे. याठिकाणी नगराध्यक्षपदी भाजपाचे कैलास घुले यांचा पराभव करत शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार सोनवणे या विजयी झाल्या आहेत.
त्र्यंबक मध्ये ८५ टक्के मतदान झाले होते. नगराध्यक्षपदी शिंदे सेनेच्या त्रिवेणी तुंगार-सोनवणे विजयी झाल्या असून, भाजपचे कैलास घुले यांचा तब्बल १८०० मतांनी दारुण पराभव झाला आहे.
याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ८, भाजपचे ६ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत.