मोठी बातमी ! नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्ष तोडीला सुरुवात, ३०० झाडं तोडली
मोठी बातमी ! नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्ष तोडीला सुरुवात, ३०० झाडं तोडली
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवनमधील झाडांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. तपोवनातील १८०० झाडांची कत्तल करू नये , झाडांना तोडू नये अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत होती. मात्र मागणीला केराची टोपली दाखवत तपोवनात झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन एसटीपी प्लांटसाठी जवळपास 300 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. 

२०२७ साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी देशभरात लाखो साधू, संत आणि भाविक नाशिकमध्ये एकवटतील. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवनमध्ये साधुग्राम बांधण्याची योजना आहे. या साधुग्रामसाठी तपोवनमधील जवळपास १८०० झाडं तोडावी लागणार आहेत. मात्र पर्यावरणप्रेमींचा या वृक्षतोडीला विरोध आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून या वृक्ष तोडीला पर्यावरण प्रेमी विरोध करत आहेत. पण सरकारने आजपासून ही वृक्षतोड सुरु केली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. साधुग्रामच्या १८०० झाडांचा प्रश्न अनुत्तरित असताना एसटीपी प्लांटसाठी झाडांची कत्तल केल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नवीन एसटीपी प्लांट उभारण्यात येणार आहे.

तपोवन परिसरात उभारला जाणारा नवीन एसटीपी प्लांट वादात सापडला आहे. तपोवनातील साधुग्रामसाठी टीडीआरद्वारे भूसंपादनास शेतकऱ्यांचा ठाम विरोध आहे. महापालिकेचा 50 टक्के टीडीआर आणि 50 टक्के रोख रक्कमेचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावलाय. आरक्षण 377 एकरांवरून 1200 एकरांपर्यंत वाढवण्यालाही शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group